नागपूर : नागपुरात संपूर्ण कुटुंबालाच ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवत ६५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. कुटुंबाला सीम कार्ड मनी लॉंड्रिंग घोटाळ्यात सहभागी असल्याची भिती दाखविण्यात आली होती. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबासोबत घटना घडली आहे. ८ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर फोन आला व समोरील व्यक्तीने तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावावर खरेदी केलेल्या सीमकार्डचा उपयोग करून उघडलेल्या बॅंकखात्यातून मनी लॉंड्रिंग सुरू असल्याने सीबीआयकडून पडताळणी करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी एका व्यक्तीचा सीबीआय अधिकारी म्हणून व्हॉट्सअपवर व्हिडीओ कॉल आला व त्याने त्याला विविध तपशील विचारले. तुमचा संबंध नरेश गोयल मनी लॉंड्रिंग स्कॅमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात येत आहे असे सांगितले.

also read

सोन्याचे दर नवीन उच्चांकीवर… हे आहे आजचे दर…

आरोपीने त्यानंतर मुलाकडून कुटुंबीय तसेच आर्थिक स्थितीबाबत जाणून घेतले. पालकांना मुलाच्या हालचालीवर संशय आल्याने त्यांनी त्याला विचारणा केली. त्याने हा प्रकार सांगितल्यावर तेदेखील घाबरले. आरोपीने त्यांनादेखील डिजिटल अरेस्टमध्ये राहण्यास सांगितले. त्यांचा व्हिडीओ कॉल सातत्याने सुरू होता. समोरील आरोपीने त्यांच्याकडून बॅंक खात्याचे तपशील घेतले. या प्रकरणातून बाहेर निघायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असे सांगितले. १० जानेवारी रोजी अधिकाऱ्याने नागपुरातून ४९ लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यात वळते केले तर त्यानंतर १३ जानेवारी रोजी विदर्भातील एका मोठ्या शहरात जाऊन तेथून २६ लाख रुपये वळते केले.बाहेर असतानादेखील त्याचा व्हिडीओ कॉल सुरू होता. संपूर्ण कुटुंब अस्वस्थ असताना एक नातेवाईक त्यांना भेटले. त्यांनी का घाबरलेले दिसता असे विचारले असता अधिकाऱ्याने आपबिती सांगितली. तुमची फसवणूक झाली आहे असे नातेवाईकाने सांगताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

also read

वाघांपाठोपाठ बिबट्यानाही “बर्ड फ्ल्यू”, प्राणिसंग्रहालय, बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा

देशभरात १४५७ कोटींनी फसवणूक

संपूर्ण देशभरात सायबर गुन्हेगारांनी एका वर्षात १४५७ कोटी रुपयांनी फसवणूक केली. एका लाखापेक्षा जास्त फसवणूक झालेल्यांमध्ये 29000 तक्रारदारांचा समावेश आहे. यावरून दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scam of 65 lakhs has been made by keeping entire family in digital arrest in nagpur adk 83 sud 02