गोंदिया: गणेशोत्सवादरम्यान नव-नवीन देखावे साकारून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ भाविकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, गोंदियात एका गणेश भक्ताने घरघुती गणेश उत्सवा दरम्यान आपल्या घरी चारधामपैकी एक असलेल्या केदारनाथधाम यात्रा व मंदिराचा भव्य व आकर्षक देखावा साकारून केदारनाथ बाबाचे दर्शन घडविले आहे. तसेच केदारनाथ धाम यात्रेदरम्यान कुठली काळजी घ्यावी, याचीही माहिती या देखाव्याच्या माध्यमातून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील जांगळे कुटुंबीय १९६५ पासून गणेशोत्सव साजरा करीत आहे. ते दरवर्षी नवनवीन देखावे तयार करून भाविकांचे लक्ष आकर्षित करत असतात आणि तयार केलेल्या देखाव्याचे फोटो, व्हिडियो सोशल मीडियावर शेयर करीत असतात. यंदा जांगळे कुटुंबीयांनी केदारनाथधामचा देखावा उभारला आहे.

हेही वाचा… श्शु… ‘टायगर जिंदा हैं!’ नव्या ‘टायगर’च्या आगमनाने गावात सामसूम; दहशत अशी की…

हा देखावा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविक जांगळेंच्या घरी रात्री उशिरापर्यंत गर्दी करीत आहेत.