लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्धा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षतर्फे अभियांत्रिकीच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांना २४ जून ते ३ जुलै या दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. सविस्तर वेळापत्रक सी ई टी च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सीईटी सेलच्या माध्यमातून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल १२ जूनला लागला. पालक व विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी चातकासारखी वाट बघत होते. अखेर उशिरा का होईना वेळापत्रक आले. २४ जून ते ४ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केल्या जाणार. महाराष्ट्रातील खुल्या संवर्गातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये नोंदणी शुल्क असून आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये नोंदणी शुल्क आहे.