अमरावती: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष शिक्षणासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता ५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुसूचित जातीच्या (एससी) प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून ५ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा… विदर्भात उद्यापासून शाळांची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी

योजनेसाठी पात्र असण्याऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे तर पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी, असे सांगतानाच अमरावती विभागातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarship scheme for study abroad extended till 5th july mma 73 dvr
Show comments