चंद्रपूर: एकतीस वर्षानी स्नेह मिलन कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या शाळकरी मित्रांनी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करताना बबलीच्या पिल्लानी दर्शन दिले. बाबलीच्या पिल्लानी या शाळकरी मित्रांना अक्षरशः मुरळ घातली.

एकत्र आलेल्या या शाळकरी मित्रांनी ताडोबा बफर झोन मधील नवेगाव गेटमधून जंगल सफारी केली. अगदी काही वेळातच बबलीच्या पिल्लांचे दर्शन झाले. यावेळी तिन्ही बहीण-भाऊ ऐटीत बसले होते. या तिन्ही बबलीच्या लेकरांच्या वेगवेगळ्या अदा बघून सारेच मित्र फिदा झालेत. आणि न कळत सर्वांच्या मुखातून एकाचवेळी वाक्य आले “व्वा क्या बात है! ते हेच. त्याचे असे झाले की वरोरा येथील आनंद निकेतन महाविद्यालयात सन १९९१-९२ मध्ये इयत्ता बारावीत शिक्षण झालेल्या मित्रांचे चिमूरजवळील तुकूम येथील टायगर इंम्पायर रिसॉर्टमध्ये नुकतेच स्नेहमिलन झाले.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
Natasa Stankovic reacts On Divorce From Hardik Pandya
घटस्फोट झाल्यानंतर पहिल्यांदाच नताशा हार्दिक पंड्याबाबत म्हणाली, “आम्ही अजूनही…”
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Kartik Aaryan’s Surprise Visit to Bhool Bhulaiyaa 3 Theatre Goes Viral – A Girl was Too Busy with Popcorn
कार्तिक आर्यन समोर अन् पोरगी पॉपकॉर्न खाण्यात बिझी, VIDEO पाहून म्हणाल असा अ‍ॅटिट्यूड हवा!

हेही वाचा… देशात वीज पडून सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात; झाडाखाली थांबल्यामुळे ७१ टक्के लोकांचे मृत्यू

डॉ. हेमंत खापणे, प्रवीण पिंपळकर, संदीप व्यापारी, अरूण उमरे, जितेंद्र निखाते, विजय मिलमिले, संदीप पाटील, डॉ. उमेश पल्लीकुंडावार, मनोज लभाने, डॉ. संजय पंडागळे, किशोर पारखी, अनिल बोबडे, विलास बोबडे, राजेश मानकर, अनुज चोपडे, दिनेश चहारे, दिलीप तितरे, आशिष देवाळकर, ज्ञानेश्वर माटे, महेंद्र खिरटकर, योगेश पिदुरकर, संदीप सातपुते आदी मित्रांनी नवेगाव गेटमधून जंगल सफारी केली.

हेही वाचा… वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिंगणघाटकर धडकले मुंबईत; आझाद मैदानात आंदोलन

ताडोबामध्ये पावसाळ्याच्या दिवसात वाघांचे दर्शन होत नाही, हा कित्येकांचा अनुभव आहे. पण एकतीस वर्षानंतर एकत्र आलेल्या मित्रांना एकाचवेळी तीन बछड्यांनी दर्शन देऊन भुरळ पाडली. केवळ भुरळ पाडली नाही तर आपल्या अदांनीही सर्वांनाच खुश केले. नवेगाव गेट हा बबली वाघीणीचा परिसर आहे. तिला तिन बछडे आहेत. त्यांचे वय साधारणतः अकरा महिने आहे. ही तिन्ही भावंड नेहमीच मौजमस्ती करतात, अशी माहिती गाईड बंडू खोब्रागडे यांनी दिली. या तिन्ही भावंडांच्या मौजमस्तीला वरोरा येथील डॉ. हेमंत खापणे यांनी आपल्या कॕमेरामध्ये कैद केले. त्यानीच आमच्या जंगल सफारीच्या आठवणी ताज्या केल्यात.

हेही वाचा… यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार; अनेक मार्ग बंद, शाळांना सुट्टी

डॉ. हेमंतची फोटोग्राफी उत्तम आहे. त्याचबरोबर तो विनोदही करत असतो. तो सोबत असल्याने आमचीही जंगल सफारी मजेदार झाली.बबलीच्या परिवारासोबत आम्ही सर्वांनी तब्बल दोन तास घालवली. त्या ठिकाणाहून आमचा पाय निघत नव्हता. पण सफारीचा वेळ झाल्याने आम्हाला निघावे लागले. बबलीच्या तिन्ही बछड्यांना टाटा बाय-बाय करत निरोप घेतला तो पुन्हा भेटू या आशेनं! अशी माहिती अरुण उमरे यांनी दिली.