नागपूर : शंकरनगरच्या सरस्वती विद्यालयातील सहलीला निघालेल्या ट्रॅव्हल्स बसचा हिंगणाजवळ अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल्स मालकाकडून तातडीने जखमींना मदत अपेक्षित होती. परंतु ट्रॅव्हल्स मालक या प्रकरणात दोषी आढळू नये, यासाठी अपघातानंतर नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयालत अपघातग्रस्त बसच्या परवान्यासाठी धावपळ करत होता. या बसची नियमबाह्य पीयूसीही त्याने काढली.

अपघातग्रस्त बस नागपूर ग्रामीण आरटीओत नोंदणीकृत आहे. तिचा क्रमांक एमएच- ४०, वाय- ७३५० असा आहे. ही बस वैभव वालके यांच्या नावावर आहे. अपघातानंतर संबंधित बस मालकाने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावणे अपेक्षित होते. परंतु त्याने कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी धावपळ सुरू केली. अपघातग्रस्त बसचा कर १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच भरला होता. त्यामुळे बस मालकाने करापोटीचे १ लाख १ हजार २३६ रुपये तडकाफडकी ऑनलाईन भरले. बसची पीयूसीही नव्हती. पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या पीयूसी केंद्रातून ती वेळेवर काढली गेली. परंतु नागपूर ग्रामीण आरटीओतील अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. वाहन उपलब्ध नसतानाही पीयूसी निघाली कशी, हाही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Shocking Video Udupi Man Tossed In Air
हवा भरताना अचानक फुटला स्कुल बसचा टायर अन् पुढे….;अंगावर शहारा आणणारा Video Viral
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Shocking video A car drags a cow calf walking across the road for 200 meters watch what happened next
सांगा चूक कोणाची? कारने रस्त्यावरून चालणाऱ्या गायीच्या वासराला २०० मीटरपर्यंत ओढत नेले; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

हेही वाचा – मंत्रिपदाची पाच वर्षांची प्रतीक्षा संपणार? अकोला जिल्ह्यातून आमदार रणधीर सावरकरांना संधी?

अपघातग्रस्त वाहनावर तीन ‘चालान’

अपघातग्रस्त बसवर तीन चालान आहेत. त्यातील एक चालान ६ फेब्रुवारी २०२३ रोजी विनापरवाना राजस्थानमध्ये बस नेल्याचा, दुसरे चालान २२ जुलै २०२३ रोजी सोलापूर परिसरात बसमध्ये अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार संच, नोंदणी चिन्ह स्पष्ट नसण्याचा तर तिसरे चालान ५ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर ग्रामीण आरटीओ परिसरात नियमभंग केल्याचा आहे. यापैकी एकही चालन बस मालकाने भरला नाही.

सहलीतील इतर बसेसची वैधताही वादात

सहलीसाठी एकूण पाच बसेस गेल्या होत्या. त्यापैकी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात नोंद असलेल्या एका बसचा अपघात झाला असला तरी इतर पूर्व नागपूर आरटीओ कार्यालयातील ३, नागपूर शहर आरटीओतील १ अशा एकूण चार बसेसच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. अपघात झाल्यावर इतर एका बसमालकानेही परवाना निर्गमित केल्याची माहिती आहे.

हेही वाचा – अवकाशात पंच ग्रह दर्शन, खगोल प्रेमींसाठी अनोखी पर्वणी…

“अपघातग्रस्त बसचा परवाना ऐनवेळी मिळवण्याचा प्रयत्न झाला. अशा घटनेमुळे सर्व शाळांनी सहलीसाठीची बस निश्चित करताना सर्व माहिती घेणे गरजेचे आहे. असे प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागासह इतरांशी समन्वय साधून योग्य ती कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांना धोका होईल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही.” – विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण.

Story img Loader