मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधा

पालकांचा मुलांशी मनमोकळेपणाने संवाद नसल्यामुळे मुले घराबाहेर झालेल्या गैरवर्तन किंवा अत्याचाराबाबत घरी बोलत नाहीत. त्यामुळे अनेक जण मुलांचा गैरफायदा घेतात. अशीच एक घटना कोराडीत उघडकीस आली असून स्कूलव्हॅनचालकाने नववीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. तिचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढून तिच्यावर अत्याचार केला. तब्बल २५ दिवसांनंतर मुलीने या प्रकरणाबाबत आईवडिलांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पवन कोहपरे (२६) याला अटक केली.

Woman Raped By Mantrik in Mumbai
Mumbai Crime : महिलेवर बलात्कार करुन दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मांत्रिकाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Asaram Bapu
Asaram Bapu : आसाराम बापूला २०१३च्या बलात्कार प्रकरणात दिलासा! राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
school Teacher misbehaved with girls
रत्नागिरी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत शिक्षकाला केले निलंबित
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक

हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक, अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कोहपरे हा मूळचा खापरखेडा जवळील नांदा येथील रहिवासी आहे. तो स्कूलव्हॅन चालवतो. पीडित १५ वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही नववीची विद्यार्थिनी आहे. ती पवनच्या व्हॅनमध्ये शाळेत ये-जा करते. पवन हा रियाशी नेहमी बोलायचा. तिला व्हॅनमध्ये समोर बसवून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. तो तिला नेहमी फोन करून आणि मॅसेज पाठवून बोलण्यास प्रवृत्त करीत होता. १२ ऑक्टोबरला पवनने तिला नेहमीप्रमाणे व्हॅनमधून आणले. कोराडी येथे पोहोचल्यावर त्याने विद्यार्थिनीला शाळेत नेण्याऐवजी तिला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने निर्जन परिसरात नेले. तेथे त्याने विद्यार्थिनीवर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिचे मोबाइलमध्ये अश्लील छायाचित्र आणि चित्रफित काढली. छायाचित्राच्या आधारे पवनने विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तो तिच्यावर पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. पवन तिला शाळेत नेण्याऐवजी जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्यचार करीत होता. पवनकडे अश्लील छायाचित्र असल्याने तिच्याशी व्हॅनमध्येच बळजबरी करायला लागला. विरोध केल्यास नातेवाईक आणि आईवडिलांना छायाचित्र दाखविण्याची धमकी देत होता. या प्रकारामुळे रियाच्या वागणुकीत फरक पडला. ती एकाकी आणि अबोल राहू लागली. त्यामुळे तिच्या आईला संशय आला. मात्र, ती काहीही सांगण्यास तयार नव्हती. तिच्या आईने तिची आस्थेने विचारपूस केली. तिचा मोबाईल तपासला असता पवनचे अश्लील मॅसेज आणि शारीरिक संबंधाची मागणी करण्यासंदर्भात मॅसेज दिसले. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा रियाने पवनच्या अत्याचाराचा पाढा वाचला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून चालक पवनला अटक केली.

हेही वाचा >>> नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

पालक आणि पाल्यांतील संवाद हरविला आहे. त्यामुळे मुलांना पालकांशी बोलण्याची भीती वाटते. मुलांवर बाहेर कुणी मारहाण केली किंवा गैरवर्तवणूक केली तरीही पालक ओरडण्याच्या भीतीपोटी पाल्य सांगत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांशी वागताना आपुलकी, प्रेमभावना आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवून वागावे. जेणेकरून बाहेरील कुणी व्यक्तीने गैरकृत्य केल्यास मुलांनी लगेच पालकांना मनमोकळेपणाने सांगितले पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले.

Story img Loader