लोकसत्ता टीम
नागपूर : पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर बारावीत शिकणाऱ्या मुलीला आईने डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. हे ऐकताच आईचा पारा चढला आईने रुग्णालयातच मुलीची चांगली चपलेने धुलाई केली. त्यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला. शेवटी मुलीने आपल्या प्रियकराचे नाव आईला सांगितले. त्यानंतर याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून मुलीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
एक शाळकरी मुलीला महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या अजानतेपणाचा फायदा घेत त्याने युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, युवतीला त्रास झाल्याने तिला दवाखाण्यात आणले असता ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे पुढे आले. हर्षल संजय टवडे (२१, रा. आठवा मैल, वाडी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
माहितीनुसार, वाडी पोलीस ठाणे हद्दीत राणी (बदललेले नाव) तिचे आई-वडील आणि लहान भावासोबत राहते. ती शिक्षण घेत असताना महाविद्यालयात शिकणारा हर्ष टवडे याच्यासोबत तिची ओळख झाली. लवकरच ते आपपसात बोलु लागले आणि मैत्रीचे नाते वृद्धींगत होत गेले. राणी ही अल्पवयीन आहे याची जाणीव हर्षल याला होती. त्याने तिच्या अजानतेपणाचा फायदा घेत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तो तिला त्याच्या घरी आणले आणि लग्नाचा विश्वास देत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिला कुठेही फिरायला घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला लागला. आई वडील घरी नसताना तो तिच्या घरी जाऊन सुद्धा तिचे लैंगिक शोषण करीत होता. अनेकदा हा प्रकार घडला.
१ ऑगस्ट २०२४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान, अवघ्या पाच महिन्यांत हा सर्व प्रकार वाढला होता. सततच्या संबंधातून राणी गर्भवती झाली. परंतु, यासंदर्भातील कुठलीही जाण तिला नव्हती. मागील काही दिवसांपासून तिला उलट्यांचा त्रास होऊ लागला. तसेच ती पोटात दुखत असल्याने आईने तिला दवाखाण्यात आणले असता डॉक्टरांनी मुलगी ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. ऐकून राणीच्या आईच्या पायाखालची वाळूच सरकली.
आईने राणीला रुग्णालयातच मारहाण केली आणि तिला मुलाच्या वडीला बाबत विचारणा केली. आईने मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली असता तिने हर्षल सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर राणीच्या घरच्यांनी वाडी ठाणे गाठत तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हर्षल याला कलम ६४(ड) भा.न्या.सं., सहकलम ४, ६, ८ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हर्षलने आमचे प्रेम संबंध असून आम्ही लवकरच लग्न करणार आहोत, अशी माहिती पोलिसांना दिली. लग्न करण्याची तयारी दर्शवली असली तरी कायद्यानुसार मुलगी अल्पवयीन आहे. त्यामुळे कायदेशीर रित्या लग्न शक्य नाही. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात आली.