यवतमाळ: जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात मध्यरात्री पासून सततधार, मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या दोन तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये आज शुक्रवार, २१ जुलै रोजी नियोजित परीक्षा वगळता एक दिवसाकरिता बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.
या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होवू नये, विद्यार्थी पुरात अडकु नये, कोणताही अनूचित प्रकार होवू नये, याकरिता आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी महागाव व उमरखेड तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये नियोजित परीक्षा वगळता आज बंद राहतील.
हेही वाचा… नागपूर: गुंडाने बसमध्ये विद्यार्थिनीचा केला विनयभंग
दरम्यान, आज सकाळपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.