लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
भारतीय विज्ञान काँग्रेस ही नव्या पिढीमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा सर्वात सशक्त पर्याय आहे. त्यामुळे विज्ञान काँग्रेसचा स्तर दरवर्षी वाढायला हवा. मात्र, हल्ली विज्ञान काँग्रेसमध्ये नको असलेल्याच गोष्टी घडत आहेत. विज्ञान सोडून आध्यात्मिक लोकांचा वावर वाढत आहे, अशी खंत पुणे येथील सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक अंबाडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>नागपूर: धीरेंद्र महाराज, दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवा! प्रा. श्याम मानव यांचे खुले आव्हान
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडे यजमानपद असलेल्या १०८व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये उपस्थित राहण्यासाठी आले नागपुरात आले असता त्यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. डॉ. अंबाडे हे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये १९९२ पासून शास्त्रज्ञ आहेत. २००८ पासून आतापर्यंत त्यांनी १२ भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये सहभाग घेतला आहे. या सदिच्छा भेटीदरम्यान डॉ. अंबाडे यांनी १०८व्या विज्ञान काँग्रेसच्या आयोजनावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, विज्ञान सोडून येथे काही चुकीच्या गोष्टी दाखवण्यात आल्या. अशा प्रकारामुळेच आज खोट्या आध्यात्मिक लोकांचे महत्त्व वाढत आहे. दरवर्षी हा विज्ञानाचा जागर होत असला तरी आधी किती आध्यात्मिक बाबा होते आणि आज त्यांची संख्या किती वाढली हे विचार करण्यासारखे आहे. भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार याचे आकर्षण असते. त्यामुळे देशातीलच नाही तर विदेशातील दहा हजारांवर लोक विज्ञान काँग्रेसला येतात. यात विज्ञानाचे जाणकार आणि चार ते पाच नाबेल पुरस्कार विजेत्यांचा सहभाग असतो. यातून विज्ञान काँग्रेसचा दर्जा हा दवर्षी वाढावा अशी अपेक्षा असते मात्र, नागपूर विद्यापीठामध्ये याची उणीव जाणवली.
हेही वाचा >>>चंद्रपूर: गरिबांचे घरांचे स्वप्न भंगणार! केंद्र सरकार राज्यातील लाखावर घरकूल परराज्यात वळवणार?
३ तारखेला कार्यक्रमासाठी आलो असता पहिल्यांदा मला मुख्य इमारतीच्या प्रवेश द्वारावर अडवण्यात आले. त्यानंतर बाहेर असलेल्या वाहनतळावर वाहन ठेवण्यास सांगण्यात आले. नंतर सुरक्षा रक्षक म्हणाला, अमरावती मार्गावरील मुख्य प्रवेश दारातून प्रवेश घ्यावा लागेल. तिकडे नोंदणी विभाग असून तेथून ओळखपत्र घेऊन कार्यक्रमाला जाता येईल. सूचना फलकाची कमतरता, स्वयंसेवक नसणे, इंडियन सायन्स काँग्रेस किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही प्रवेशाचे द्वार, नोंदणी कक्ष याची माहिती न दिल्याने माझासारख्या अनेकांना कितीतरी वेळ पायी फिरत राहावे लागले. इतर ठिकाणच्या विज्ञान काँग्रेसमध्ये सर्वत्र त्या विद्यापीठांचे स्वयंसेवक उभे असतात. प्रवेश करताच आपल्याला कुठे जायचे आहे याची चौकशी करून योग्य मार्गदर्शन करतात. मात्र, नागपूर विद्यापीठामध्ये असे काहीच घडले नाही. विद्यापीठाने रेल्वेस्थानक आणि विमानतळावरच सूचना फलक लावणे आवश्यक होते, अशी अपेक्षाही डॉ. अंबाडे यांनी व्यक्त केली.
मुख्यालय कोलकात्यात, म्हणून बंगालींचा भरणा
इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचे मुख्यालय कोलकात्यात असून येथे बंगाली लोकांचा सर्वाधिक भरणा आहे. याचा परिणाम म्हणून १०८व्या विज्ञान काँग्रेमध्ये बोलावण्यात आलेले बहुतांश व्याख्याते हे बंगाली होते. यातून एका राज्याला झुकते माप दिल्याचे दिसून आले. देशाच्या अन्य भागातही मोठ्या प्रमाणावर तज्ज्ञ असून त्यांना डावलण्यात आले. ही काही बंगाल काँग्रेस नाही, अशा कठोर शब्दात डॉ. अंबाडे यांनी टीका केली.
हेही वाचा >>>नाशिक : चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परत
नाशिक : चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून तक्रारदारांना परतवक्त्यांचा अपमान केला
विविध परिसंवादांमध्ये सहभागी होणाऱ्या वक्त्यांना बोलूच दिले नाही, असा आरोपही डॉ. अंबाडे यांनी केला. आयोजकांनी जेवणाची सोय उत्तम केली. मात्र, आम्ही येथे जेवायला नाही तर आमच्या संशोधनावर बोलायला आलो होतो. परंतु, पाच मिनिटे भाषण झाले की थांबवले जात होते. हा शास्त्रज्ञांचा अपमान आहे.