वर्धा : वर्धा येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास एक तासापूर्वी भीषण आग लागली असून त्यावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहे. तूर्तास तीन अग्निशमन गाड्या आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या भांदारातून गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. वासिम यांचे हे गोदाम असल्याची माहिती मिळाली आहे.जुने प्लास्टिक,पेयजल बॉटल, लाकूड फाटा असल्याने आग चांगलीच भडकत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आगीने लगतच्या गोदामात शिरकाव सुर केल्याची माहिती घटनास्थळी असलेले उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी सांगितले.प्रशासनातील काही अधिकारी घटनास्थळी हजर  झाले आहे.या आगीमुळे लाखो रुपये किमतीची हानी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.