नागपूर : घरोघरी डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण वाढले असतानाच आता स्क्रब टायफसनेही डोके वर काढले आहे. नागपूर विभागात ११ रुग्ण आढळले असून त्यापैकी सहा उपराजधानीतील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. नागपुरातील रुग्णालयात झालेल्या दोन मृत्यूंपैकी एकाच्या मृत्यूचे कारण स्क्रब टायफस असल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या मृत्यूचेही कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आढळलेल्या ११ रुग्णांमध्ये ग्रामीणमधील १, भंडारा १, गडचिरोली २, चंद्रपूर २, चंद्रपूर ग्रामीण १, वर्धा १, मध्य प्रदेशातील ३ रुग्णांचा समावेश आहे. एम्समध्ये दगावलेल्या ७१ वर्षीय महिलेच्या मृत्यूचे कारण स्क्रब टायफस असून ती वर्धेची रहिवासी होती.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांना शिक्षा होणार की निर्दोष सुटणार? ५ सप्टेंबरला सुनावणी, नेमकं प्रकरण काय?

महापालिकेच्या आरोग्य विभागाने मात्र अद्याप शहरात एकही रुग्णाची नोंद झाली नसल्याचा दावा केला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत दाखल रुग्णांपैकी २ एम्समध्ये, २ किंग्जवे रुग्णालयात, २ गेटवेल रुग्णालयात दाखल असल्याची नोंद आरोग्य उपसंचालक कार्यालयात करण्यात आली आहे. या वृत्ताला नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दुजोरा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेडिकलमध्येही सध्या एक रुग्ण दाखल आहे. राज्यात आढळलेल्या स्क्रब टायफसच्या एकूण रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण नागपूर विभागातीलच असल्याचे कळते.

राज्यात गेल्यावर्षी ३०७ रुग्णांची नोंद

राज्यात या आजाराचे गेल्यावर्षी ३०७ रुग्ण आढळले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये ५ रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू झाला. २०२० मध्ये सात रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Gold Price: रक्षा बंधनला सोन्याच्या दरात उसळी; नागपुरात ‘हे’ आहेत दर

स्क्रब टायफस म्हणजे काय?

स्क्रब टायफस हा एका विशिष्ट प्रकारच्या रिकेटशिया प्रकारच्या जीवाणूपासून पसरणारा आजार आहे. झुडपांमध्ये वस्ती करणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या कीटकाने (माईट) चावल्यामुळे मानवाला हा आजार होतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scrub typhus patients in nagpur mnb 82 ssb