वर्धा : सार्वजनिक उद्यानाच्या सुरक्षा रक्षकाने एकतर्फी प्रेमातून तेथील महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर अ‍ॅसिड फेकून जाळण्याची खळबळ – जनक घटना गुरुवारी रात्री घडली. शहराच्या मध्यभागी असलेल्या महावीर उद्यानात रात्री चांगलीच वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. यापैकी एक अर्जुन चाफले याने उद्यानाच्या तिकीट खिडकीवर बसलेल्या पीडितेच्या अंगावर अ‍ॅसिडसारखे ज्वलनशील द्रव्य फेकले.

प्रसाधनगृह स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे हे द्रव्य असल्याचे सांगितले जाते. पीडितेने वेळीच सावध होत चेहऱ्यावर ओढणी ओढली. पण तरीही हातावर व पाठीवर दाहक पदार्थ पडल्याने तो भाग जळाला. तिला त्वरित सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या घटनेने उद्यानात चांगलीच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर व अन्य वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी अर्जुन यास अटक केली.

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Mumbai woman entered house in Malad and tried to rob 91 year old woman
डोळ्यात मिरचीपूड टाकून महिलेच्या लुटण्याचा प्रयत्न
Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
Anjali Damania on Walmik Karad
Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या…
Story img Loader