नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब असल्याच्या पुन्हा एकदा ई-मेल विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला, दोन महिन्यांतील चौथा आणि आठवडाभरातील दुसरा  मेल आहे. सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या (एएआय) नागपूर कार्यालयाला सोमवारी सकाळी ७ च्या सुमारास हा मेल प्राप्त झाला आहे. धमकीचा मेल प्राप्त येण्याचा आठवड्याभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी देखील दोनदा असा मेल नागपूर विमानतळ प्रशासनला मिळाला होता. देशातील अनेक विमानतळाला असे मेल आल्याचे समजते. अशाप्रकारे परदेशातून येणाऱ्या मेलमुळे विमानतळ प्रशासन अस्वस्थ झाले असून त्यांची अवस्था ‘ लांडगा आला रे आला’  अशी झाली आहे.

हेही वाचा >>> वर्धा : दारूडा ‘त्याला’ दगडाने ठेचत होता; लोकांची मात्र बघ्याची भूमिका! काही जण व्हिडिओ काढण्यात व्यग्र…

सोमवारी नागपूर विमातळाला मिळालेल्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणांनी कसून तपासणी केली. त्यामध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. मात्र, प्रवाशांची सुरक्षा बघता सर्कतेचा इशारा दिला असून विमानतळावरील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमकीचे मेल गेल्या काही महिन्यांपासून विविध विमानतळांना प्राप्त होत आहेत. असाच प्रकार सोमवारी सकाळी ७ ते ७.३० वाजतादरम्यान घडला. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला (एएआय) सकाळी विमानतळावर बॉम्ब असल्याचा मेल प्राप्त झाला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) चमूद्वारे दक्षता बाळगण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत सुरक्षा तपासणीत वाढ करण्यात आली आहे. वाहनतळ परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. विमानतळाच्या हद्दीबाहेरही गस्त घालण्यात येत आहे. विमानतळाच्या सुरक्षेत पोलीस कार्यरत आहे. खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा! उपराजधानीसह अनेक जिल्हे कोरडे

दरम्यान, २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये प्रवासी संख्या २.२८ लाखांनी वाढली आहे. नागपूरसाठी ही प्रवासी संख्या आजवरची सर्वाधिक आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे बघून स्टार एअर या हवाई वाहतूक कंपनीने नागपूरहून पुणे, बंगळुरू आणि नांदेडकरिताअतिरिक्त विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंडिगो संभाजीनगर करिता विमानसेवा देणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २०२३-२४ या आर्थिक वर्षांत २७.९४ लाख लोकांनी विमान प्रवास केला. वर्षभरात २२ हजार विमानांनी उड्डाण घेतले. यामध्ये नागपुरातून परदेशात गेलेल्यांची संख्या १.११ लाख तर घरगुती प्रवाशांची संख्या २६.८३ लाख आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security on high alert after nagpur airport gets bomb threat email rbt 74 zws
Show comments