नागपूर : पोलिसांचा गुन्हेगारांशी नेहमीच सामना होतो. पोलिसांना अनेकदा गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात यशही येते, पण साप आणि तेही ८ फूट लांब साप समोर बघून पोलिसही घाबरले, ते चक्क कक्ष सोडून गेले. त्यानंतर काय झाले वाचा.
नागपूर पोलीस कंट्रोल रूममध्ये शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास कक्षात साप आढळून आला. कर्तव्यावरील पोलीस शिपायाला समोरून खूप मोठा साप कक्षात जाताना दिसल्यावर तो ओरडला. सर्व पोलीस शिपाई घाबरले व तात्काळ सर्पमित्र शुभम पराळे यांना संपर्क साधून बोलावून घेण्यात आले. साप कक्षातील रेकॉर्डस् आणि तेथील वस्तुंमागे दडला होता. सर्पमित्र पराळे यांनी वेळ न घालवता सापाचा शोध घेतला. सापाला त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर बुटीबोरी जंगलात सोडून दिले. ८ फूट लांब असलेला साप धामण असल्याचे समजते.