नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील कारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल जाहीर झाला आहे. या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार सीमा मनोज नेवारे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
हेही वाचा- दुर्मिळ योग; ८ डिसेंबरला ‘मंगळ’ पृथ्वीच्या जवळ येणार, आणि…
प्रत्येक आमदारांना आपल्या विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत रुची असते. आता तर थेट सरपंच पदासाठी निवडणूक आहे. त्यामुळे साहजिकच आमदारांना या निवडणुकीत व्यहरचना करणे आलेच. काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील भिवापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतमध्ये सरपंचपद आपल्याकडे राहावे यासाठी डावपेच आखले. त्यानुसार येथे कोणत्याही पक्ष समथित उमेदवार रिंगणात येऊ शकला नाही.आमदार राजू पारवे यांच्या डावपेचामुळे सीमा मनोज नेवारे बिनविरोध निवडून आल्या आहेत.
हेही वाचा- गडचिरोली: अंबाडीच्या भाजीतून विद्यार्थ्यांना विषबाधा; शासकीय आश्रमशाळेतील प्रकार
भिवापूर तालुक्यात एकूण १० ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यापैकी काँग्रेस प्रणित कारगाव ग्रामपंचायत येथील सरपंच पदाचे उमेदवार अविरोध निवडून आले. कारगाव ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. काँग्रेसकडून सीमा नेवारे यांना उमेदवारी देण्यात आली. इतर कोणत्याही पक्षाने शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. ही निवडणूक अविरोध व्हावी यासाठी आमदार पारवे यांनी प्रयत्न केले होते. त्यांना यश आले आहे.