विविध महत्त्वाच्या खात्यात काही कामे निधीअभावी रेंगाळलेली असतात. निधी न मिळाल्याने जनतेला आवश्यक सोयी मिळत नाही. अशा महत्त्वाच्या कामांना वेगळे करीत त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणारी गतीशक्ती ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कृत केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अकोला : २५ टक्के संत्रावर्गीय फळे विक्रीस अयोग्य; काढणीपश्चात ‘या’ चुका टाळा

याच योजनेत रेल्वे खात्याच्या उपक्रमांतर्गत वर्धा, सेवाग्राम, पुलगाव व चांदुर रेल्वे या चार स्थानकांची निवड झाली आहे. या स्थानकांना विशेष निधी प्राप्त झाल्यानंतर त्याचे रुपडे पालटणार आहे. म्हणजे फलाट, वाहनतळ, रंगरंगोटी व अनुषंगिक सैंदर्यीकरणाची कामे मार्गी लागणार आहेत. अंदाजित अडीचशे कोटी रुपये खर्चाची ही कामे असून रेल्वे विभाग त्याचा प्रस्ताव तयार करीत असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. ही कामे लवकरच मार्गी लागण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of four stations namely wardha sevagram pulgaon and chandur railway in prime ministers gati shakti yojana pmd 64 dpj