नागपूर : भारतीय वनसेवेतील अधिकारी शैलेश टेंभुर्णीकर यांच्या नियुक्तीने तब्बल दोन दशकानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) पदावर एका मराठी माणसाची वर्णी लागली आहे. या नियुक्तीमुळे वनखात्यातील मराठी अधिकाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

वनबलप्रमुख हे वनखात्यातील सर्वोच्च पद आहे. यापूर्वी या पदावर रवींद्र सुळे, श्री. बल्लाळ या काही मराठी अधिकाऱ्यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यानंतर भारतीय वनसेवेतील दाक्षिणात्य अधिकाऱ्यांकडेच हे पद राहिले. आता तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा या पदावर शैलेश टेंभुर्णीकर यांच्या रुपाने एक मराठी अधिकारी लाभल्याने खात्यातील इतर मराठी अधिकाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.

Nitin Gadkari campaigned for Mahayuti in 13 days across Maharashtra during Assembly elections
गडकरींकडून महाराष्ट्र पालथा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
Shiv Nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news
शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर उद्योगपती; आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांचे दातृत्व
Sharad Pawar
Sharad Pawar : “राज्यात ‘मविआ’चं सरकार आल्यास ३ लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार”, शरद पवारांचं मोठं आश्वासन
article on Trade industry industry group Check for changing rules Bank loans
लेख: भयमुक्त व्यापारउद्याोग करण्याची संधी…
Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला

हेही वाचा – सणासुदीच्या काळात आपत्कालीन भारनियमनाचे संकट, वीज उत्पादन व मागणीचा ताळमेळ साधण्यासाठी महावितरणची कसरत

मात्र, त्याचवेळी त्यांच्याकडून अपेक्षादेखील वाढल्या आहेत. आतापर्यंत वनविभागाचे धोरण ठरवताना महाराष्ट्र वनसेवेतील अधिकाऱ्यांना त्यात बोलावले जात नव्हते. धोरणात्मक बाबी ठरवताना त्यांचा सहभाग घेतला जात नव्हता. मात्र, आता या अधिकाऱ्यांनाही स्थान मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. वनबलप्रमुख पदासाठी गुणवत्ता आणि ज्येष्ठता या दोन बाबी तपासल्या जातात. या पदासाठी दावेदार असणारा अधिकारी ज्येष्ठता यादीत समोर असेल, पण गुणवत्ता यादीत जर तो मागे असेल, तर त्याला या पदासाठी पात्र समजले जात नाही. शैलेश टेंभुर्णीकर मात्र ज्येष्ठतेबरोबरच गुणवत्तेतही उजवे ठरले आणि त्यामुळेच त्यांची वनबलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

वनसंरक्षणासाठी २००६ साली त्यांना सुवर्णपदक मिळाले. तर सामाजिक वनीकरण विभागात सहसंचालक असताना जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कामाचे केंद्र सरकारने कौतुक केले. राज्यात वनीकरणातील कार्बन फायनान्स आणि मूल्यांकन या विषयावर अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी आयोजित केले.

हेही वाचा – गोतस्करीला बल्लारपूर न्यायालयाची चपराक; ‘हे’ दिले आदेश…

भारतीय वनसेवेच्या १९८७ च्या तुकडीतील ते अधिकारी आहेत. स्थापत्य विषयात त्यांनी अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. संगणक व्यवस्थापन डिप्लोमा व वानिकी शाखेची पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.