नागपूर : आकाशाला भिडलेले टोमॅटोचे दर पुढचे काही महिने तसेच कायम राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. पावसाळ्यात भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. यात टोमॅटोचे दर सर्वाधिक आहे. प्रतिकिलो १६० ते २०० रुपये याप्रमाणे विकले जात आहेत. सरकारकडून दर खाली यावे म्हणून प्रयत्न केले जात असले तरी भाव किंचित कमी होईल. पूर्ववत होणार नाही. ते होण्यासाठी दोन महिने तरी लागेल, असे नागपूरचे ठोक विक्रेते चंद्रमणी बोरकर यांनी सांगितले. बोरकर यांनी कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या टोमॅटो उत्पादक राज्यांना भेट दिली. तेथील स्थितीचा अभ्यास करून त्यांनी दरवाढीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, आजूबाजूच्या राज्यात विषाणूंमुळे टोमॅटोचे उत्पादन कमी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उच्च दर्जाचे टोमॅटो तामिळनाडूला जात असून तेथे त्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या दिल्ली, हिमाचल प्रदेश येथून टोमॅटो आणला जात असून तो नागपूरमध्ये अधिक भावाने विकला जात आहे. येत्या काही दिवसात उत्तर प्रदेश, पं. बंगाल, राजस्थान, गुजरातमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर कमी होण्याची शक्यता नाही. एक महिन्यानंतर महाराष्ट्रात लातूर आणि औरंगाबादमध्ये काही प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन होईल, त्यांतर किंचित भाव उतरतील, असा बोरकर यांचा दावा आहे.