नागपूर : भ्रमनध्वनी वापरणाऱ्यांना सातत्याने अधून-मधून विविध देवी-देवतांचे संदेश येतात. २० लोकांना संदेश पाठवा आपल्या मनोकामणा पूर्ण होईल, असे त्यात नमुद केले असते. सध्या गजानन महाराजांशी संबंधित असाच संदेश फिरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – वनरक्षक भरती, २१३८ जागांसाठी जाहिरात, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्ण संधी

संदेशात बरेच दावे केले गेले आहे. त्यात शेगाव जवळील अचलपूर या गावात गजानन महाराजांचा चमत्कार झाला. येथील मंदिरात पुजारी पूजा करत असताना त्याला गजानन महाराज म्हणाले, मी गावातील एका घरात मुलाच्या रुपाने जन्म घेईल. जे लोक धर्माचा नाश करतात त्यांचा मी नाश करेल. जो व्यक्ती माझ्या नावाने २० व्यक्तींना हा संदेश पाठवेल, त्याची २० दिवसांत मनोकामना पूर्ण होईल. पण जी व्यक्ती संदेश पाठवणार नाही, त्याचे नुकसान होईल, असे नमुद करण्यात आले आहे. दरम्यान शेगाव संस्थानातील पुजाऱ्याकडून असे संदेश पाठवले जात नसल्याचे श्री गजानन महाराजांच्या भाविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send gajanan maharaj message fulfill your wishes what is the matter mnb 82 ssb