फसवणूक झाल्यास सायबर ठाण्यात तक्रारीचा पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनिल कांबळे

नागपूर :  डिजीटल पेमेंटचा पर्याय आल्याने सर्वच ठिकाणी लाखोंची उलाढाल मोबाईलवरून केली जात आहे. मात्र, अनेकदा घाईमुळे भलत्याच खात्यात पैसे वळते होतात. अशा स्थितीत घाबरून न जाता गेलेले पैसे परत मिळवता येतात. नागपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने अनेकांना पैसे परत मिळाले आहेत.

एकमेकांच्या बँक खात्यात पैसे वळते करणे किंवा एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे चुकते करण्यासाठी मोबाईलचा वापर केला जातो. भारत पे, गुगल पे, पेटीएम आणि आपापल्या बँकेच्या अ‍ॅपचा वापर केला जातो. तसेच आता पाणी, वीज, फोनचे देयक, शिक्षण शुल्क, टीव्ही आणि मोबाईलचे रिचार्ज करण्यासाठीही अ‍ॅपचा वापर केला जातो. थेट मोबाईल वॉलेटमध्ये पैसे ठेवले जातात. परंतु, अनेकदा एकमेकांना पैसे पाठविताना अनवधानाने किंवा घाईघाईने पेमेंट करण्याच्या नादात भलत्याच खात्यात पैसे जातात. अशावेळी अनेकदा डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. अशा स्थितीत गोंधळ उडतो आणि काय करावे, हे सुचत नाही. कमी रक्कम असल्यास ग्राहक दुर्लक्ष करतात. परंतु मोठी रक्कम असल्यास ग्राहक प्रतिनिधींना फोन किंवा ई-मेल  केला जातो. परंतु, वेळीच मदत मिळत नाही. अशाप्रकारच्या अनेक तक्रारी सायबर क्राईम विभागाकडे आल्या असून पैसे परत मिळवून देण्यात आले आहेत.

पैसे पाठवण्यापूर्वी काय कराल?

क्युआर कोड स्कॅन करून किंवा केवळ मोबाईल क्रमांकावरून पैसे वळते करताना संबंधित नंबरवर बँक व्हॉलेट सुरू असल्याची खात्री करा, खात्री न केल्याने अन्य व्यक्तीच्या खात्यावर पैसे जाऊ शकतात. नव्याने सीमकार्ड घेतलेल्या व्यक्तीच्या खात्यावर तो नंबर यापूर्वी सुरू असल्याचे काही प्रकार समोर आलेले आहेत. पैसे पाठवताना घाईघाईत एखादा अंक चुकल्यास देखील पैसे भलत्याच खात्यात जाऊ शकतात. त्यामुळे क्रमांकाची खात्री करा. क्युआर कोड स्कॅन केल्यावर आलेले नाव पैसे स्वीकारणाऱ्याचेच आहे की नाही याची खात्री करा.

चुकीच्या खात्यावर पैसे गेल्यास काय कराल?

  •   संबंधित अ‍ॅपचा वापर करून ट्रान्झ्ॉक्शनला रिपोर्ट करा
  •   २४ तासांच्या आत बँकेस लेखी अर्ज करा
  •   बँकेच्या मदतीने पैसे वळते झालेल्या बँकेस कळवून रक्कम गोठवा
  •   समोरील व्यक्तीस संपर्क साधून त्याच्याकडून संबंधित बँकेत ना हरकत प्रमाणपत्र घ्या
  •   व्यक्ती रक्कम परत करण्यास नकार देत असल्यास किंवा त्याने रक्कम काढल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईममध्ये तक्रार द्या.

चुकून कुणाच्या खात्यात पैसे वळते झाल्यास गोंधळून न जाता बँकेत तक्रार अर्ज करा. जेणेकरून बँकेच्या वतीने ती रक्कम गोठवता येईल. तसेच पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्यास थेट नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करा.

– सुकेशिनी लोखंडे, पोलीस अधिकारी, सायबर क्राईम.