काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याचा परिणाम २०२४ च्या निवडणुकीत निश्चित दिसेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पल्लम राजू यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>>नागपूर: अपात्र ठरवल्याचा निर्णय मागे घेण्याची कुलगुरूंवर नामुष्की; राजीनाम्याच्या मागणीला पुन्हा जोर

पल्लम राजू हे हाथ से हाथ जोडो अभियानाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. प्रदेश काँग्रेसची विस्तारित बैठक मंगळवारी नागपुरात होत आहे. त्यासाठी पल्लम राजू आज सोमवारी येथे आले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाचे कसे नुकसान झाले, याची कल्पना आली. त्याचा परिणाम २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निश्चितच दिसेल. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा संदेश देशभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राबवण्यात येत आहे. यातून देशाला एकजूट करण्याचे काम केले जाईल. पक्षाचे नेते या अभियानाच्या माध्यमातून बुथ आणि ब्लॉक पातळीवरील लोकांशी संवाद साधतील. अशाप्रकारे राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा >>>नागपूर: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, सिव्हिल लाईन्समधील राणीकोठी येथे प्रदेश काँग्रेसची मंगळवारी दुपारी २ वाजता विस्तारित बैठक होत आहे. यामध्ये पल्लमू राजू, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासर्व आमदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader