जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा चिखलीतील ‘अनुराधा परिवार’ शिल्पकार सिद्धिविनायक उपाख्य तात्यासाहेब बोन्द्रे यांचे आज निधन झाले. मागील काही काळापासून ‘वानप्रस्थाश्रम’ मध्ये राहणाऱ्या व आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्म मध्ये रमलेल्या या नेत्याने ८२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा >>>नागपूर: आमदाराचा कोप आणि….मेळघाट व्याघ्रप्रकल्पात पसरली होती भयाण शांतता

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांचे ते वडील होते. काँग्रेस विचारसरणीचा आजीवन पुरस्कार करणाऱ्या तात्यासाहेबांनी पक्षाने दिलेली प्रत्येक जवाबदारी समर्थपणे सांभाळली. चिखली पालिका अध्यक्षपदाची राजकारण व समाजकारण क्षेत्रात वावरताना त्यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक व सहकार क्षेत्रातही लक्षणीय कामगिरी बजावली. अनुराधा अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, अनुराधा औषध निर्माण महाविद्यालय, सहकारी बँक, मुंगसाजी महाराज सूतगिरणी व अनुराधा साखर कारखाना उभारून त्यांनी चिखली परिसराच्या प्रगतीत योगदान दिले. अनुराधा परिवाराचे ते संस्थापक होते. मागील काही वर्षापासून सार्वजनिक क्षेत्रातून अंग काढून घेत ते अध्यात्मिक क्षेत्रात रमले होते. मुंगसाजी महाराज संस्थान, नाव्हा( जिल्हा जालना) येथील रंगनाथ महाराज संस्थानची त्यांनी धुरा सांभाळली. दीर्घकाळ पासून ते अनुराधा महाविद्यालय परिसरातील ‘ पर्णकुटी’ मध्ये राहत होते. तिथेच त्यांनी आज शुक्रवारी( दि २४) सकाळी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा >>>नागपूर: शिंदे- फडणवीस सरकार जनतेच्या प्रश्नापासून लांबच.. सदाभाऊ खोत यांचा घरचा आहेर..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदारकीची हुलकावणी!
दीर्घ राजकीय जीवनात त्यांनी संघटनेत विविध पदावर काम केले. सन १९७४ मध्ये ते चिखली पालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र क्षमता असूनही आमदारकीच्या उमेदवारीने त्यांना कायम हुलकावणी दिली! त्या तुलनेत त्यांचे पुत्र राहुल बोन्द्रे हे भाग्यवान ठरले. ते दोनदा चिखली मतदारसंघाचे आमदार राहिले. सन २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या श्वेता महाले यांनी त्यांचा पराभव केला.