लोकसत्ता टीम
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रमेश कुथे यांनी आज शुक्रवारी भाजपला रामराम केला आहे. त्यांनी त्यांचा राजीनामा भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे. रमेश कुथे हे शिवसेनेकडून १९९५ आणि १९९९ असे दोनदा निवडून आले आहेत.
१९९५ मध्ये त्यांनी गोंदिया विधानसभा या काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस चे तत्कालीन विद्यमान आमदार हरिहरभाई पटेल यांचा पराभव केला होता. त्यानंतर १९९९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुक एकत्रित झाली असताना त्यांनी काँग्रेसचे अजितकुमार जैन यांचा पराभव केला होता. त्यानंतर मात्र २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे गोपालदास अग्रवाल यांच्या कडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर रमेश कुथे यांनी २०१४ मध्ये शिवसेना सोडून नितीन गडकरी यांच्या उपस्थतीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा पासून ते भाजप पक्षात ज्येष्ठ नेते म्हणून मिरवत होते.
आणखी वाचा-अमरावती : चक्क पाण्याखाली योगसाधना! पोलीस कर्मचाऱ्याची अनोखी कामगिरी
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या पराभव झाला. गोंदिया भंडारा लोकसभेत पण भाजप उमेदवार सुनिल मेंढे पराभूत झाले. दरम्यान मागच्या आठवड्यात काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नवनिर्वाचित खासदार डा.प्रशांत पडोळे हे दोघे गोंदियात एका लग्न सोहळ्यात आल्यानंतर मध्यरात्री १२:३० सुमारास माजी आमदार रमेश कुथे यांच्या गुरुनानक वॉर्ड येथील निवास स्थानी नाना पटोले आणि डा. प्रशांत पडोळे यांनी भेट दिली होती.
त्याच रात्री माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात राज्यातील अनेक आजी माजी आमदार काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य केले होते. आज माजी आमदार रमेश कुथे यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिलेल्या हा सदस्यतवाचा दिलेला राजीनामा त्याला जोडूनच बघितला जात आहे. या संदर्भात त्यांना विचारणा केली असता आज मी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य चा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला असल्याची माहिती लोकसत्ता सोबत बोलताना दिली.
आणखी वाचा-येत्या २४ तासात विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’
‘धाकटे भाऊ त्यांचा निर्णय…’
माजी आमदार रमेश कुथे यांचे धाकटे बंधू निवर्टमान गोंदिया नगर पालिकेत भाजचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी पण भाजप सोडली का असे विचारले असता त्यांनी आपला निर्णय स्वत: घ्यावा मी माझा निर्णय घेतला असल्याचे रमेश कुथे यांनी सांगितले.