लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघांचे काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते पार पडणाऱ्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा निमित्त स्थानिक वर्तमान पत्रात दिलेल्या जाहिरातीमध्ये काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांचे छायाचित्र नसून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांचा फोटो झळकत असल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा-महाराष्ट्रात गारठा वाढणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

वाशीम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघ काँग्रेस चा परंपरागत गढ म्हणून ओळखला जातो. येथील आमदार अमित झनक असून त्यांच्या मतदार संघातील शिरपूर जैन येथे १९ जानेवारी रोजी विविध योजने अंतर्गत ४ कोटी ५१ लक्ष रुपये विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्या हस्ते पार पडणार आहे, याच लोकार्पण सोहळा च्या स्थानिक वर्तमान पत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये काँग्रेसच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यांना स्थान न देता चक्क शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा फोटो झळकत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

नेमकी काय जाहिरात आहे. त्यात काय आहे. याविषयी कल्पना नाही. मात्र याविषयी माहिती घेऊन शहानिशा करतो. -देवानंद पवार, प्रभारी, काँग्रेस जिल्हा वाशीम