कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार मिळवणारी मी तिसरी किंवा चौथी स्त्री असावी. गेल्या १७ वर्षात या पुरस्कारासाठी प्रतिष्ठानला मोजक्याच स्त्रिया का पात्र वाटल्या, अशी प्रश्नवजा खंत ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांनी व्यक्त केली. एवढेच नाही तर नाशिकच्या पुरस्कार सोहळ्यातदेखील ही खंत आपण बोलून दाखवणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा >>>नागपूर: परीक्षेचा ताण नको, रोजगाराचे शेकडो पर्याय उपलब्ध! तज्ज्ञ डॉ. मंजूषा गिरी व डॉ. प्रवीण डहाके यांचे आवाहन
ज्येष्ठ साहित्यिक आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने त्यांचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अभिनंदन सोहोळ्यात आशा बगे यांनी स्त्रियांकडे, त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष का केले जात असावे, असा प्रश्न उपस्थित केला. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये स्त्रीया कमी आहेत. साहित्य संमेलन अध्यक्षपदाबाबतही हीच स्थिती आहे. मला पदाचा मोह नाही आणि पुरस्काराचाही, पण स्त्रीयांच्या बाबतीतच असे का असावे, असा प्रश्न करून त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.