नागपूर : चित्रपट अभिनेते सुशांत सिंह राजपूतची आधीची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप केले आले आहेत. दरम्यान, माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात दिशा सालियन प्रकरणावरुन खळबळजनक दावाकेला आहे.

दिशावर लैंगिक अत्याचार करून खून करण्यात आला. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गांभीर्य दाखवले नाही. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्वांची नार्को टेस्ट, ब्रेन मैपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचे आहे, अशी मागणी देखील याचिकेतून केली आहे. सदर प्रकरणी विशेष सरकारी वकिल नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी. एनआयए किंवा सीबीआय मार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा, असेही सतीश सालियन यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून म्हटले आहे.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर ‘ या पुस्तकात दिशाच्या मृत्यूप्रकरणाबाबत वेगळाचा दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना याप्रकरणात गोवण्याचे राजकीय षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी गृहमंत्र्यांच्या पुस्तकात काय?

दिशा सालियान प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर ‘ मध्ये राजकीय षडयंत्र उलथवून टाकणाऱ्या गृहमंत्र्यांची आत्मकथा या पुस्तकात मांडला आहे. त्यांच्याविरुद्ध १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा खोटा आरोप करून तुरुंगात टाकण्याचे षडयंत्र करण्यात आले, असा दावा करणाऱ्या पुस्तकात. दिशा सालियान प्रकरणात लेखक लिहतात… ‘मला या प्रतिज्ञापत्रात असं काही खोटं लिहायला सांगण्यात आलं होतं, जेणेकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुलगा, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि मंत्री आदित्य ठाकरे हे दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात अडकतील. त्यासाठी मला या प्रतिज्ञापत्रात खोटंच असं लिहायला सांगण्यात आलं की- पोलिसांकडून मला (म्हणजे गृहमंत्र्यांना) मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची आधीची मॅनेजर दिशा सालियनच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले होते. तिथे आदित्य यांनी ‘ड्रिंक ‘ घेतल्यावर दिशा सालियनवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने आरडाओरड करायला सुरुवात केल्यावर आदित्य ठाकरे यांनी तिला बाल्कनीतून खाली फेकलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असं मला खोटं लिहायला सांगितलं होतं, असा दावा अनिल देशमुखांच्या पुस्तकात केला आहे.