अकोला : चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार करून मातृत्व लादल्या प्रकरणी अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालय, (विशेष न्यायालय) एस. जे. शर्मा यांनी गुरुवारी आरोपी भावाला १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.घटनेच्या वेळी पीडिता अल्पवयीन असल्याचा समाधानकारक पुरावा उपलब्ध नसल्याने पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमामधून आरोपीस निर्दोष ठरविण्यात आले.सिव्हिल लाईन्स ठाण्यांतर्गत चुलत बहिण घरात एकटी असताना तिच्यावर चुलतभावाने अनेकवेळा बळजबरीने बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी गरोदर राहिली. जिल्हा स्त्री रुग्णालयात तिची प्रसूती झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉक्टरांनी ही बाब पोलिसांना कळवली. पोलिसांनी मुलीची चौकशी करून १० फेब्रुवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले. न्यायालयाने साक्षी व पुरावे ग्राह्य धरून १० वर्ष सक्तमजुरीचा कारावास, ५ हजार रुपये दंड न भरल्यास, एक वर्ष साधा कारावास तर कलम ५०६ मध्ये २ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ५ हजार रूपये दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगाव्या लागणार आहेत. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sentenced to hard labor in the case of sexually abusing a cousin akola ppd 88 amy