चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथी कैद्यांकरिता स्वतंत्र बॅरेक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कारागृह प्रशासनाने बॅरेकचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मंजुरीकरीता पाठविण्याचे निर्देश कारागृह प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे लवकरच चंद्रपूरच्या कारागृहात तृतीयपंथी कैद्यांकरिता स्वतंत्र बॅरेक उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कारागृहात अभिविक्षक मंडळाची त्रैमासिक बैठक घेतल्यानंतर त्यांनी कारागृहाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कारागृह प्रशासनाला तृतीयपंथी कैद्यांकरिता स्वतंत्र बॅरेक तयार करण्याचे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. या बैठकीला न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, दंडाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, कार्यकारी अभियंता (विद्युत) पूनम वर्मा, निरीक्षक (वेलफेअर) राहुल चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी हेमचंद कन्नाके, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, सा.बां. विभागाचे उपविभागीय अभियंता अंबुले, परीविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, उपअभियंता भूषण येरगुडे, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, अशासकीय सदस्य ओमप्रकाश गनोरकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा – नागपूर : खासगी टोईंग व्हॅनमुळे वाहतूक पोलीस सुस्त! कमाईचा मोठा स्रोत गेल्याने नाराजी, वाहनावरील मजुरांची रस्त्यावरच ‘दादागिरी’

हेही वाचा – नागपुरातील एसटी कार्यालयासमोर महिलेचे उपोषण.. विभाग नियंत्रकांच्या विरोधात…

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा व इतर सदस्यांनी कारागृहातील पाकगृहास भेट देऊन बंद्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची तसेच बंद्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची धान्य गोदामामध्ये तपासणी केली. त्यानंतर महिला व पुरुष विभागामध्ये जाऊन बंद्यांच्या अडी-अडचणीची विचारणा केली व समस्या निवारण करण्याचे आश्वासन दिले. कारागृहामध्ये तृतीयपंथी कैद्यांकरिता बॅरेकचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मंजुरीकरीता पाठविणे, त्यासोबतच कारागृह सुरक्षा व सुविधेकरीता कारागृहामध्ये मल्टीपर्पज हॉल, वॉच टॉवर, अतिसुरक्षा कक्षाचे बांधकाम करण्याच्या सूचना दिल्या. कारागृह सुरक्षेकरीता कारागृहामध्ये जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वाकी टॉकीज यंत्रणा बसविणे, तसेच मोबाईल जॅमर बसविण्याकरीता वरिष्ठ कार्यालयाशी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Separate arrangement for transgenders in chandrapur district jail rsj 74 ssb
Show comments