नागपूर : राज्यातील बाबू कारागिरांना एकत्र करून त्यांनी तयार केलेली बांबूची विविध उत्पादने विकण्यासाठी ई-मार्केटिंगची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याची योजना आहे. शिवाय बुरुड येथे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ सुरू करणार असल्यामुळे त्याचा फायदा ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांना होईल, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव यांनी केले.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, बांबू सोसायटी ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टर, वनराई फाऊंडेशन व रोटरी इलीट यांच्या संयुक्त वतीने जागतिक बांबू दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धनवटे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासा राव, बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टरचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट सुनील जोशी, विदर्भ केंद्राचे नवनियुक्त अध्यक्ष अजय पाटील, रोटरी इलिटचे अध्यक्ष शुभंकर पाटील उपस्थित होते. संशोधन, प्रशिक्षण, विविध कलात्मक वस्तूंची निर्मिती, विक्री अशा अनेक आघाड्यांवर राज्य सरकार बांबू क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करीत असल्याचे राव यांनी सांगितले.गिरीश गांधी म्हणाले, बांबू हे पर्यायी पीक म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात आल्यास त्यांच्या स्थितीत आमूलाग्र बदल होईल. श्रीनिवासा राव यांनी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाद्वारे सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचा आढावा घेतला.
हेही वाचा : ‘लंपी’ आजाराचा प्रभाव वाढतोय ; ३ जनावरांचा मृत्यू, ३८ बाधित
प्रास्ताविकातून शुभंकर पाटील यांनी बांबूचा ‘ग्रीन गोल्ड’ असा उल्लेख केला. सूत्रसंचालन करताना अजय पाटील यांनी केले. कार्यक्रमाला विजय जावंधिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार डॉ. विजय इल्लोरकर यांनी मानले. बांबू हा सर्वसमावेशक असून त्याचे अनेक गुणधर्म आहेत. बांबूला राजमान्यता मिळाल्यास चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल व एक मोठा उद्योग उदयाला येईल, असा आशावाद बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट सुनील जोशी यांनी व्यक्त केला. उद्घाटनानंतर बांबू उद्योगाला कार्यशील उपक्रम बनवणे या विषयावर ते बोलत होते. बिंग स्टुडिओच्या संस्थापक प्रियंका खंडेलवाल म्हणाल्या की, भारतात बांबूचे चांगले उत्पादन होत असून त्यातून वेगवेगळ्या आकर्षक वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. गरज केवळ ‘मार्केट कनेक्ट’ची आहे.