नागपूर: प्रवासासाठी खुला झाल्यावर पहिल्या दिवसापासून अपघातांच्या मालिकांमुळे चर्चेत आल्यानंतरही नागपूर- शिर्डी समृध्दी महामार्गालाच वाहनधारकांची प्रथम पसंती असल्याचे महामार्गावरील टोल वसुलीवरुन स्पष्ट होते. ११ डिसेंबरला २०२२ ला नागपूर – शिर्डी या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर. आतापर्यंत २० कोटी ६६ लाख ३३ हजार रुपयांची घरात टोल वसुली झाली.
नागपूर ते मुंबई ७०० किलोमीटरचा हा महामार्ग असून त्याचे ५४० किलोमीटरचे शिर्डी पर्यतचे काम पूर्ण झाले. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले. पहिल्या दिवसांपासून अपघाताला सुरूवात झाली, मनुष्याच्या जीवित हानी सोबतच अनेक वन्यप्राणी सुसाट धावणाऱ्या वाहनाचे बळी ठरले.
हेही वाचा >>> चंद्रपूर : विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू
दुसरीकडे महामार्गवर पेट्रोल पंपासह इतर कुठल्याही सुविधा नसल्याचा मुद्दा गाजला. या नंतरही महामार्गावरून धावणाऱ्यावाहनांची संख्या वाढतच आहे हे टोल वसुलीवरुन स्पष्ट होते. या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या या मार्गाचे काम जवळपास ८० टक्के पूर्ण झाले आहे.११ डिसेंबर पासून नागपूर-शिर्डी दरम्यान वाहतूक सुरू झाली. आतापर्यंत महामार्गावरून ३ लाख ५५ हजार पेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. २१ कोटी रुपयांच्या घरात टोल वसुली झाल्याचे सांगण्यात येत आहे.