नागपूर: भांडवली बाजारातील धडकी भरवणारे चढ-उतार, सोने आणि गृहनिर्माण क्षेत्रातील मंदावलेले भाव आणि बँकांचे खाली-वर जाणारे व्याजदर, यामुळे म्युच्युअल फंडाकडे सुरक्षितता व स्थिरता म्हणून गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले आहे. गरज, उद्दिष्टानुरूप अपेक्षा आणि जोखीम घेण्याच्या तयारीप्रमाणे गुंतवणुकीच्या उपलब्ध अनेकविध योजनांतून नेमकी निवड कशाची करायची, यासंबंधीचे मार्गदर्शन उद्या शनिवारी ‘लोकसत्ता अर्थभान’च्या विशेष सत्रातून केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता अर्थभान’च्या या सत्राचे आयोजन हे मुख्य प्रायोजक ‘आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंडा’च्या सहयोगाने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता, चिटणवीस सेंटर, बॅनियन हॉल, ५६ मंदिर रोड, डोभीनगर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होत आहे. गुंतवणूक करताना मागील कामगिरी बघून गुंतवणूक करण्याची मानसिकता दिसून येते. भूतकाळात जी कामगिरी झालेली आहे, तशीच ती भविष्यात होईल, याची खात्री नसते. यामुळेच गुंतवणूक करताना नक्की गरज व जोखीम या गोष्टींचा विचार करून गुंतवणूक करणे कसे आवश्यक आहे, याचे मार्गदर्शन केले जाणार आहे.

हेही वाचा… थकबाकी वसुलीसाठी आता ‘दामिनी’चा ‘वार’; सात हजारावर वीज ग्राहक रडारवर

आर्थिक स्वयंनिर्भरता ही उत्पन्नातून खर्च वजा जाता राहणाऱ्या थोड्याथोडक्या का होईना, पण नियमित बचत आणि गुंतवणुकीतून शक्य आहे. याची उकल गुंतवणूक विश्लेषक कौस्तुभ जोशी आणि आर्थिक नियोजन तज्ज्ञ प्रसाद फडणवीस हे या कार्यक्रमातून करतील. उपस्थित गुंतवणूक-उत्सुकांना या तज्ज्ञांना या निमित्ताने थेट प्रश्नही विचारता येतील.

‘श्रीमंत’ निवृत्तीसाठी काय कराल?

  • कधी : शनिवार, ६ जानेवारी २०२४
  • केव्हा : सायंकाळी ६.०० वाजता
  • कुठे : चिटणवीस सेंटर, बॅनियन हॉल, ५६ मंदिर रोड, डोभी नगर, सिव्हिल लाईन्स, नागपूर
  • वक्ते : कौस्तुभ जोशी (गुंतवणूक विश्लेषक)
  • विषय : गुंतवणुकीद्वारे अर्थनियोजन
  • वक्ते : प्रसाद फडणवीस (आर्थिक नियोजन तज्ज्ञ)
  • विषय : निवृत्तीनंतरच्या समृद्ध जीवनासाठी तरतूद
    (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. योजनेसंबंधी सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.)
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Session of loksatta arthabhan tomorrow guidance on choosing investment options for wealthy retirement dag 87 dvr