गडचिरोली : तब्बल तीन दशकांपासून हिंसक चळवळीत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत जहाल महिला नक्षलवादी कांता ऊर्फ कांताक्का ऊर्फ मांडी गालु पल्लो (५६) तसेच सुरेश ऊर्फ वारलू ईरपा मज्जी (३०) या दोघांनी गुरुवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. कांतक्कावर १६, तर सुरेशवर २ लाखांचे बक्षीस शासनाने ठेवले होते. पुनर्वसनानंतर आता त्यांना अनुक्रमे साडेआठ लाख व साडेचार लाख रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांता ऊर्फ कांतक्का ही गुडंजुर (रिट), ता. भामरागड) येथील, तर सुरेश ऊर्फ वारलू हा मिळदापल्ली ता. भामरागड या गावचा रहिवासी आहे. कांताक्का विभागीय समिती सदस्य (पुरवठा टीम), तर सुरेश वारलू हा भामरागड दलममध्ये सदस्य पदावर काम करत असे. कांताक्का हिने १९९३ मध्ये मद्देड दलममध्ये भरती होऊन नक्षल चळवळीचा प्रवास सुरू केला. १९९८ पर्यंत ती उत्तर गडचिरोलीतील प्लाटून क्र. २ मध्ये सदस्य होती. पुढे तिची भामरागड दलममध्ये बदली झाली. २००१ मध्ये तिला उपकमांडर पदी पदोन्नती मिळाली. नंतर चातगाव दलममध्ये तिने काम केले. २००६ मध्ये तिने क्षेत्रीय समिती सदस्य म्हणून पदोन्नती मिळवली. २००८ पासून ती विभागीय समिती सदस्य म्हणून टिपागड, चातगाव व कसनसूर दलममध्ये केएमएस (क्रांतिकारी महिला संघटन) संघटनेमध्ये २०१५ पर्यंत तिने काम केले. २०१५मध्ये तिची माड एरियातील पुरवठा टीममध्ये बदली झाली.

राजू वेलादीचा अंगरक्षक

सुरेश ऊर्फ वारलू मज्जी हा २०२१ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर दाखल झाला. सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याने काम केले. २०२४ मध्ये त्याची विभागीय समिती सदस्य राजू वेलादी उर्फ कलमसाय (भामरागड दलम) याचा अंगरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

दोन महिन्यांत २२ नक्षल्यांची शरणागती

चालू वर्षी दोन महिन्यांत आतापर्यंत २२ नक्षलवाद्यांनी गुन्हे प्रवासाला पूर्णविराम देत आत्मसमर्पण करून सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, राज्य राखीव दलाच्या १९२ बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यां