नागपूर : ऐन उन्हाळ्यात रेल्वेगाड्या रद्द करण्याचा आणि विलंबाने चालवण्याचा रेल्वेने सपाटा लावला असून त्यामुळे प्रवासाचा नियोजित बेत रद्द करावा लागत असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे.२९, ३० मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.तिसरा आणि चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी नॉन-इंटरलॉकिंगचे काम किंवा यार्ड मॉडलिंग किंवा अन्य कामे सुरू असतात.
त्यामुळे काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबाने सोडण्यात येत आहेत. आता जळगाव ते मनमाड दरम्यान नॉन-इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेने २९ मे रोजी नागपूरहून निघणारी नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस आणिण ३० मे रोजी मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस रद्द केली आहे. याशिवाय भुसावळ विभागात धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत.