भुसावळ विभागात विविध तांत्रिक कामे सुरू असल्याने नागपूर मुंबई आणि नागपूर- पुणे एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
भुसावळ विभागात पाचोरा येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. हा मार्ग मनमाड ते जळगावला जोडण्यात येत आहे. त्यासाठी ‘ब्लॉक’ घेण्यात आला. त्यामुळे नागपूर-पुणे एक्स्प्रेस १३ ऑगस्टला, पुणे-नागपूर एक्स्प्रेस १४ ऑगस्टला, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस १४ ऑगस्टला आणि मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस १५ ऑगस्टला रद्द करण्यात आली आहे.