नागपूर : उपराजधानीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातील सात रुग्णांमध्ये करोनाचे निदान झाले. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – बुलढाणा : बोरांच्या आकाराच्या गारांनी शहर परिसराला झोडपले
विदर्भात एकच प्रादेशिक मनोरुग्णालय असून ते नागपुरात आहे. येथे सुमारे ४५० ते ५०० मनोरुग्णांवर उपचार सुरू आहे. येथे दाखल होण्यासाठी येणाऱ्या व लक्षणे असलेल्या रुग्णांच्या नित्याने चाचण्या होतात. गुरुवारी झालेल्या चाचणीत सात मनोरुग्णांमध्ये करोनाचे निदान झाले. त्यापैकी एक रुग्ण हा गंभीर असून त्याला तातडीने उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले. तर इतर रुग्णांना विलगीकरण वार्डात ठेवण्यात आले. गेल्या महिन्याभरात येथे आणखी चार रुग्णांमध्ये करोनाचे निदान झाले असून ते बरेही झाल्याची माहिती रुग्णालय प्रसासनाने दिली.