मंगरूळपीर तालुक्यातील येडशी येथील तुकाराम पाटील यांच्या शेतात आज सकाळी ११ वाजता मजुरांना सोयाबीनमध्ये सात फुटी अजगर आढळून आला. सर्पमित्रांनी अजगराला पकडून वन विभागाच्या स्वाधीन केले. शेतात साप आढळून आल्याची माहिती पोलीस पाटील गणेश बारड यांनी साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या बचाव पथकाचे सदस्य आदित्य इंगोले यांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच समन्वयक प्रा. बापुराव डोंगरे यांना माहिती देऊन पथकाचे सदस्य आदित्य इंगोले, शुभम हेकड, प्रवीण गावंडे,व विलास नवघरे घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा भाविकांवर लाठीमार ; शिपाई निलंबित
पाहणी केली असता सोयाबीनमध्ये अंदाजे ७ फूट लांबीचा अजगर आढळून आला. यावेळी पथकाच्या सदस्यांनी सदर अतिशय तापट अजगर सुरक्षित रित्या पकडला. या घटनेची माहिती वनरक्षक अहिरे यांना दिली व त्यांच्या उपस्थितीत सर्पमित्र अमोल खंडारे तसेच पथकाचे सदस्य शुभम हेकड, प्रवीण गावंडे यांनी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.