वर्धा: राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना डिसेंबर २०२३ पर्यंत एका वर्षासाठी दरमहा पाच हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यावर्षी चैतन्य परब – शास्त्रीय संगीत, पवन झोडगे – पखवाज, पवन सिडाम – तबला, पार्थ भुमकर – पखवाज, जगमित्र लिंगाडे – तबला, सुर्यकांत शिंदे – पखवाज व यश खडके – हार्मोनियम या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
हेही वाचा… सोयाबीन पीक विमाधारक शेतक-यांना मिळणार २५ टक्के अतिरिक्त रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
शास्त्रीय संगीतात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेत विविध चार उपक्रम राबविल्या जात असून त्यापैकीच एक हा उपक्रम आहे. दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळते. शासनाची तज्ञ समिती सहा गायन व सहा वादन क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करते. शासनाची तज्ञ समिती सहा गायन व सहा वादन क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड करते.