वर्धा : सेलू तालुक्यातील जंगलापूर फाट्याजवळ आज झालेल्या अपघातात सतरा प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी महामंडळाची एक बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यातील प्रवाशांना घेण्यासाठी बसच्या मागेच नागपूर दिग्रस ही बस थांबून होती. या दरम्यान नागपूरकडून येणाऱ्या देगलूर ते नांदेड या बसच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात उभ्या दोन्ही बसला धडक दिली. या आकस्मिक धडकेने प्रवासी आदळले.

हेही वाचा – अकोला : आधारकार्ड तात्काळ अद्ययावत करा, नाहीतर..

यापैकी एक बसचालक उदगीरचे बालाजी कांबळे यांना मोठा मार बसला. त्याचवेळी नागपूरवरून येत असलेले आमदार डॉ. भोयर यांनी घटनास्थळी थांबून विचारपूस केली. बसचालक कांबळे व अन्य एक दोन जखमींना स्वतःच्या गाडीत घेवून त्यांनी सेलूचे ग्रामीण रुग्णालय गाठले. डॉक्टरांना मदतीबद्दल विचारणा करीत ते निघाले. तीन बस रस्त्यावर ठप्प पडल्याने वाहतूक बराच वेळ ठप्प पडली होती. जखमीमध्ये प्रामुख्याने नागपूरचे प्रवासी आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seventeen passengers injured in bus accident in wardha pmd 64 ssb
Show comments