नागपूर : महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडीची लाट अनुभवायला येत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यावर जाणवू लागला आहे. प्रामुख्याने विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झालेला दिसून आला. विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातदेखील तापमान कमी झालेले दिसून आले.
हेही वाचा – युवकांच्या ‘आत्मदहना’ने गाजला प्रजासत्ताकदिन! पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ!
हेही वाचा – वर्धा : देव तारी त्याला कोण मारी! माजी आमदारांची कार उलटली, सुदैवाने…
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत तापमानातील ही घसरण कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा यासह राजस्थानमध्येसुद्धा थंडीचा कडाका जाणवू शकतो. देशाच्या काही भागांत किमान तापमान पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी तर काही भागांत ते दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने येत्या ३१ जानेवारीपर्यंत उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे. संपूर्ण देशातच सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीची लाट आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे. महाराष्ट्रातदेखील किमान तापमानाच्या पाऱ्यात मोठी घसरण दिसून येत आहे.