नागपूर : दोन माजी महापौर आणि केंद्रीयमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या गांधीबाग झोनमधील वस्त्या सहा महिन्यांपासून मलवाहिन्या फुटण्याच्या समस्यांसह अतिक्रमण, साचलेला कचरा, वाहनतळाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. तक्रार करूनही प्रशासक लक्ष देत नसल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
गांधीबाग झोन हा शहरातील प्रमुख व्यापारपेठेचा परिसर आहे. जुन्या नागपुरातील हा परिसरात जीर्ण झालेल्या मलवाहिन्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मुसळधार पाऊस आली की मलवाहिन्या फुटतात. लोकांच्या घरात दूषित पाणी येते.

सिरसपेठ, गंगाबाई घाट समोरील आणि शिवाजीनगर येथील झोपडपट्टी परिसरात हा प्रश्न अधिक भेडसावतो. मस्कासाथ, बजेरिया आणि मोमीनपुरा या परिसरात स्वच्छतेबाबत तक्रारी आहेत. दोन-दोन दिवस कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत. त्यामुळे नागरिक कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात. विशेष म्हणजे, या झोनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्या परिसराच्या भोवतालीही कचरा साचलेला दिसतो.महाल, गांधीबाग, बडकस चौक हा बाजारपेठांचा भाग आहे. येथे कुठेही वाहनतळाची सोय नाही. रस्त्यावर वाहने उभी केली जातात.

हेही वाचा : वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी ४२ तपासणी नाके, सीसीटीव्ही

सणासुदीच्या दिवसात तर या भागात पायी चालणे कठीण होते. अनेक भागात सिमेंट रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहे. बडकस चौकाकडून गांधीपुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा खड्डा करून सहा महिने झाले. मात्र, अजूनही तो बुजवला नाही. गांधीपुतळा ते बडकस चौक आणि बडकस चौक ते चिटणीस पार्क व अयाचित मंदिर या परिसरातील दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. माजी महापौैरांच्या प्रभागात कचऱ्यांची आणि अतिक्रमाची समस्या आहे. बजेरिया आणि मोमीनपुरा या भागात नाल्या व गटारी साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाणी येत असल्यामुळे नागरिकांना त्रास होतो.

७३० पैकी ११० तक्रारींचीच दखल

महापालिकेत प्रशासकाची नियुक्त झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात गांधीबाग झोनअंतर्गत आयुक्त आणि महापालिकेच्या वेबसाईटवर ७३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी केवळ ११० समस्यांची दखल घेतली असल्याची माहिती समोर आली.

जुन्या स्कुटर, कारवर न्याहारीचे टेबल, सायकलवर हात धुण्याचे पात्र ; टाकाऊ वस्तूंपासून साकारले महामेट्रोचे उपाहारगृह

तक्रारींची नियमितपणे दखल

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जाते. काही ठिकाणी मलवाहिन्या फुटण्याची समस्या आहे. तेथे काम सुरू आहे. अतिक्रमण कारवाई दररोज केली जात आहे. – गणेश राठोड, सहायक आयुक्त

Story img Loader