लोकसत्ता टीम

नागपूर : सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरच्या आड देहव्यवसाय करून घेणाऱ्या बिट्झ युनिसेक्स प्रोफेशनल सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लरच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या तावडीतून पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली. तसेच कारवाईत २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भावेश उदयसिंग गेडाम (रा. २९ रा. प्लॉट नंबर ५३, गोरेवाडा, गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सदर पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली.

Saif Ali Khan, Mumbai , Mohammed Shariful Islam,
“हो, मीच केलं…”, आरोपीची कबुली, सैफवरील हल्ल्याचे प्रकरण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
elon musk danger for world
इलॉन मस्क नावाचा धोका
Drain
कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पक्षांच्या घिरट्या, मुलांचं लक्ष जाताच पायाखालची जमिनच सरकली; माणुसकीला काळिमा फासणारी घटना उजेडात
Dhananjay Mund
वाल्मिक कराडबरोबर आर्थिक हितसंबंध? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले
Saif Ali Khan News
Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानवर हल्ला करणारा हल्लेखोर आधी त्याच्या घरी सफाई कामगार म्हणून गेला होता? नेमकी काय माहिती समोर?
Anjali Damania Dhananjay Munde
“आता राजीनामा द्यायची तयारी करा”, सहकारी नेत्यांच्या वक्तव्यांचा दाखला देत अंजली दमानियांचा धनंजय मुंडेंना टोला
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

माहितीनुसार, सदर पोलीस ठाणे हद्दीतील जे.पी हाईट, बैरामजी टाऊन, गोंडवाना चौक येथे ‘बिट्झ युनिसेक्स प्रोफेशनल सलून अ‍ॅण्ड मसाज पार्लर’ आहे. येथे मागील काही दिवसांपासून तरुणांची मोठी गर्दी दिसून येत होती. या सलूनमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात होता. गेल्या आठवड्यात पार्लरमध्ये अल्पवयीन मुलींसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे तेथे ग्राहकांची चांगलीच गर्दी देखील वाढू लागली होती. आरोपी भावेश गेडाम हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता तरुणींना पैशांचे आमिष दाखवत या व्यवसायात ओढत होता. त्यानंतर त्यांना ग्राहक तसेच जागा उपलब्ध करून देण्याचे काम करायचा.

आणखी वाचा-राज्यात गारठा वाढणार, नागपूर १० अंश सेल्सिअसवर..

दरम्यान, पोलिसांना या सर्व प्रकाराची कुणकुण लागली. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी या पार्सरवर बनावट ग्राहक पाठवला. त्याने तरुणीची मागणी केली. भावेशने त्याला लगेच दोन तरुणींपैकी एकीची निवड करण्यास सांगितली. त्याने पाच हजार रुपये दिले. त्याने काही वेळातच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी इशारा केला. पोलिसांनी लगेच छापा टाकला. यावेळी आरोपी भावेश हा तरुणींकडून देहव्यवसाय करून घेताना मिळून आला. कारवाईत पोलिसांनी दोन पीडित तरुणींची सुटका केली. तर आरोपीच्या ताब्यातून १ भ्रमणध्वनी, १० हजार रुपयांची रोकड, डीव्हीआर व ईतर साहित्य असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरूद्ध कलम १४३(३) भान्यासं सहकलम ४, ५, ७ पिटा अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा केला आहे. आरोपीला जप्त मुद्देमालासह सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आणखी वाचा-बल्लारशा-चंद्रपूर मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघ ठार

दोन्ही तरुणींचे आर्थिक शोषण

दोन्ही तरुणी त्याच्या पार्लरमध्ये काम मागण्यासाठी आल्या होत्या. त्याने सुरुवातील काम दिले आणि त्यांनी आंबटशौकीन ग्राहकांकडे गेल्यास अर्धेअर्धे पैसे देण्याची तयारी दर्शवली. देहव्यापार करण्यास तयारी न दर्शविल्यास काम सोडून जावे लागेल, अशी धमकी दिली. त्यामुळे दोन्ही तरुणींनी होकार दिला. मात्र, भावेश हा प्रत्येक ग्राहकांकडून ५ हजार रुपये घेत होता आणि तरुणींना केवळ एक हजार रुपये देऊन त्यांचे आर्थिक शोषण करीत होता.

Story img Loader