अमरावती : एका विवाहित महिलेसोबत युवकाने प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकाराची चित्रफित बनवून ती समाज माध्यमांवर प्रसारीत करण्यात आली. ही संतापजनक घटना लोणी ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण काशिनाथ गजभिये (२९) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. किरण हा पीडित ३६ वर्षीय महिलेच्या परिचयातीलच आहे. त्यामुळे किरणचे पीडित महिलेच्या घरी येणे-जाणे होते. जानेवारी २०२० मध्ये किरणने वहिनी, तुम्ही मला खूप आवडता, असे पीडित महिलेला म्हटले. पीडित महिलेचा पती हा दारूच्या आहारी गेल्याने त्यासुद्धा किरणकडे आकर्षित झाल्या होत्या. त्यानंतर किरणने त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी किरणने आपल्या मोबाइलवर या प्रकाराची चित्रफित देखील तयार केली.
हेही वाचा >>> वर्धा : भुरट्या चोरीतल्या ‘त्या’ तिघी अखेर जाळ्यात अडकल्याच…
पीडित महिलेने ही चित्रफित मोबाईलमधून काढून टाकण्याची मागणी आरोपीकडे केली. मात्र, आरोपीने ही चित्रफित डिलिट केली नाही. उलट चित्रफित प्रसारीत करण्याची धमकी देऊन त्याने वारंवार पीडित महिलेचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने आक्षेपार्ह चित्रफित इंटरनेटवर अपलोड करून समाज माध्यमांवर प्रसारीत केली. हा प्रकार लक्षात आल्यावर पीडित महिलेने लोणी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी किरणविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.