लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर: नागपुरातील एक पबमध्ये नोकरी करणाऱ्या एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर सलग ११ महिने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रथम धीरज नकवे (२१, वरोरा. चंद्रपूर) याला अटक केली.

पीडित २६ वर्षीय विवाहित महिला पतीसह गोंदीयाला राहत होती. मात्र, दारुड्या असलेला पती वारंवार तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायचा. त्यामुळे ती ६ वर्षांच्या मुलीला घेऊन नागपुरात आली. एका मैत्रिणीच्या संपर्कात आली आणि ती अंबाझरीत भाड्याने राहू लागली. ती एका मैत्रिणीसह अंबाझरीतील एका पबमध्ये रात्रीची नोकरी करीत होती. तिच्या मैत्रिणीच्या खोलीवर प्रथम नकवे हा अनेकदा मुक्कामी येत होता. १० ऑगस्ट २०२२ मध्ये मैत्रिणीने तिची प्रथमशी ओळख करून दिली. तिलाही एका मित्राची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रथम आणि महिलेने एकमेकांचे संपर्क क्रमांक घेतले. प्रथम याच्याशी नेहमी ती भेटत होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

आणखी वाचा-वाशीम: माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक शिकलेल्या शाळेची दयनीय अवस्था!

महिलेने मुलगी आणि वेगळ्या राहणाऱ्या पतीबाबत त्याला माहिती दिली. त्याने पतीला घटस्फोट दिल्यास लग्न करण्याचे आमिष दाखवले. दोघेही एकाच खोलीवर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले. या दरम्याने दोघांनी वारंवार सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाला. तो बळजबरी तिच्यावर बलत्कार करून तिला मारहाण करायला लागला. पबमधील कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन तिला टाळायला लागला. तिने लग्नाबाबत विचारणा केली असता प्रथमने तिला थेट नकार दिला. त्यामुळे तिने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ठाणेदार विनायक गोल्हे यांच्या आदेशावरून बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.