नागपूर : एकाच दिवशी घडलेल्या तीन लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी उपराजधानी हादरली. यामुळे शहरातील मुली व महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या तीनही घटना सोमवारी उघडकीस आल्या. याप्रकरणी एका नराधमाला पोलिसांनी अटक केली, तर दुसरा फरार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या घटनेत, सोमवारी दुपारी १० आणि ११ वर्षांच्या दोन मैत्रिणी घराच्या छतावर खेळत होत्या. दरम्यान, आरोपी महेंद्र गजभिये (५०) हा तेथे आला. त्याने दोन्ही मुलींचा विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेजारी राहणारी अन्य एक मुलगी तेथे आली. तिने बघितले आणि आरडाओरड केली. त्या मुलीला कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती रडायला लागली. तीनही मुली छतावरून खाली गेल्या आणि नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी जरीपटका पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – Video : नागपूर : धावत्या शिवशाही बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांचा जीव वाचला

हेही वाचा – नाना पटोलेंना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला एक खोका मिळतो? आशीष देशमुखांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले

दुसरी घटना जरीपटक्यात उघडकीस आली असून, सात वर्षीय मुलगी शेजारी राहणारा आरोपी संघपाल साखरे (३०) याच्या घरी गेली होती. संघपालने मुलीवर अत्याचार केला. मुलगी रडत-रडत घरी गेली. आईने विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. मुलीसह आई जरीपटका पोलीस ठाण्यात पोहचली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून संघपालविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual assault on three girls in nagpur on the same day one accused arrested other absconding adk 83 ssb