अमरावती : सुमारे ३१ वर्षांपूर्वी झालेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेची तक्रार एका ४४ वर्षीय महिलेने अमरावती पोलिसांकडे केल्याने पोलीसही अवाक झालेत. ही महिला पाच वर्षांची असताना तिच्यावर भावाकडूनच बलात्कार करण्यात आला होता. हा प्रकार तिने आई-वडिलांन‍ा सांगितल्यावर त्यांनी घराची इभ्रत चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले, पण तीन दशके हे विष पचवणाऱ्या या महिलेने अखेर पोलीस ठाणे गाठले.

पीडित महिला पती आणि मुलासह दिल्लीजवळच्या नोएडा येथे राहते. पीडिता पाच वर्षांची असताना तिच्या सख्ख्या भावाने बलात्कार केला. लैंगिक शोषणाचा हा प्रकार अनेक वर्षे चालला. १९८३ ते १९९१ या कालावधीत राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नागरी वसाहतीत घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित महिलेने पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्री या महिलेच्या भावाविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेचा ५२ वर्षीय भाऊ मुंबईतील मालाड भागात राहतो. या प्रकरणी महिलेने दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगासह नोएडा पोलीस ठाण्यातदेखील तक्रार दाखल केली आहे.

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
rape and murder of 2 minor sisters in Pune
Pune Rape-Murder : पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

हेही वाचा : सेवा हक्क कायदा असताना सेवा पंधरवड्यामधून राजकीय हित साधण्याचा प्रयत्न!

पीडितेचे वडील अमरावतीत नोकरीवर असताना ती राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई, वडील आणि भावासह वास्तव्याला होती. त्यावेळी ही घटना घडली. आठ वर्षे पीडितेचे शोषण करण्यात आले. तिने पालकांना याची माहिती दिली, पण त्यांनीही दुर्लक्ष केले. नंतर तिचे आणि तिच्या भावाचे लग्न झाले. कालांतराने तिचे वडील दगावले. आईची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला चकार शब्द काढता आला नाही. तिच्या डोक्यात मात्र विचारचक्र फिरत राहिले. बलात्काराची जखम भरून निघू शकली नाही. अखेर ३१ वर्षांनतर तिने आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader