नागपूर : चंडीगढ येथे आयोजित राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत नागपूरच्या शादाब पठाणने सुवर्णपदक पटकाविले आहे. २३ वर्षाखालील शादाबने पाच हजार मीटर शर्यतीत ही सुवर्णकामगिरी केली आहे. शादाबने १४ मिनिट ६.१० सेकंदात पाचशे मीटर धाव पूर्ण करत स्पर्धा विक्रमही आपल्या नावी नोंदविला. उत्तरप्रदेशच्या विनीत राठीने १४ मिनिटे १२.४६ सेकंदात धाव पूर्ण करत रौप्यपदक प्राप्त केला तर दिल्लीच्या अनुजकुमारने (१४ मिनिटे १२.७७ सेकंद) कांस्य पदक पटकाविला. शादाबने यापूर्वी दहा हजार मीटर स्पर्धेतही सुवर्णपदक मिळविला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शादाब पठाण नागपूर शहरातील आघाडीचा ॲथलिट असून त्याने अनेक राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले आहे. मागील वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत त्याने पाच हजार मीटरच्या शर्यतीत स्पर्धा विक्रम स्वत:च्या नावी केला होता. राज्य खुल्या स्पर्धेतही त्याने पाच हजार आणि दहा हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. शादाब ग्रामीण पोलिस दलात कार्यरत रवींद्र टोंग आणि उमेश नायडू यांच्या मार्गदर्शनात सराव करत आहे.