वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज सायंकाळी उशिरा एक बैठक संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आक्षेप घेतल्याने पक्षाचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. पैसा देणार कुठून? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला. इच्छुक उमेदवारांना हे स्पष्ट करण्यात आले. गेल्यावेळी अमरावती व भंडारा मतदार संघ आपल्या पक्षाने लढले होते. आता ते मिळत नाही, म्हणून वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मागितला व तो मिळालाही. आता काँग्रेसला तो मिळणार नाही, असे पक्षनेत्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बुलढाणा : ‘मुहूर्त’ ठरला, पडघम वाजले; ‘नवरदेव’ मात्र ठरेना! बुलढाणा मतदारसंघातील चित्र

शरद पवार ही जागा आता अजिबात सोडणार नाही, अशी ग्वाही मिळाल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व अन्य नेते उपस्थित होते. एक इच्छुक नितेश कराळे गुरुजी म्हणाले की, माझी शरद पवार यांच्यासोबत तीन वेळा बैठक झाली. उद्या राहुल गांधी यांची सभा झाल्यावर नंतर पुन्हा एक बैठक होईल. प्रश्न पैसे लावण्याचा आला. एका दिवसात तेरा लाख रुपये केवळ वाहनांवर खर्च होतात. दहा दिवसात एक कोटीवर पैसे लागणार, हे कोण लावणार? असे प्रश्न नेत्यांनी उपस्थित केले. बाकी खर्च वेगळाच. त्याबाबत खर्च आराखडा तयार ठेवण्याची सूचना झाली. बोलणार नाही पण मी माझे बजेट सांगितले, असे एक नेता म्हणाला. एकंदरीत, या बैठकीत वर्धेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच लढणार, असा नूर दिसून आल्याचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar ncp party candidate to contest from wardha constituency pmd 64 zws
Show comments