राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा दिल्याच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे. मुर्मू यांच्या रूपात आदिवासी समाजातील महिलेला संधी मिळाली असून, आपण त्यांना पाठिंबा दिल्यास आनंद होईल, असा प्रेमळ आग्रह शिवसेनेच्या आदिवासी नेत्यांनी, महिला पदाधिकाऱ्यांनी धरला होता. यामुळेच राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १२ जुलै रोजी केली. हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावापोटी घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल होते. याच पाठिंब्यावर आता पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नक्की वाचा >> राज ठाकरे – फडणवीस भेटीदरम्यान उपस्थित असणाऱ्या नांदगावकरांचं युतीसंदर्भात सूचक विधान; म्हणाले, “पवार साहेबांनी…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा