वर्धा : माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती हेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले होते. या दोघांची भाषणे व प्रामुख्याने गडकरी यांची टोलेबाजी रंगतदार ठरणार अशी अपेक्षा श्रोते ठेवून होते. पण सत्कार प्रयोजन पाहून दोघेही विकास विषयक भाष्य करीत मोकळे झाले. त्यात पवार यांनी गडकरी यांची केलेली खुली प्रशंसा लोकांना भावली. शरद पवार म्हणाले की राजकारण व समाजकारण जोडीने चालण्याची बाब नितिन गडकरी यांच्यात दिसून येते. राजकारणात मतभेद असतात. पण ते विकासाच्या आड येवू नये अशी त्यांची दृष्टी असते. कोणताही पक्ष किंवा राज्य असो, गडकरी हे भेद नं करता राष्ट्रहितास प्राधान्य देतात. विकासाची भूमिका घेऊन काम करतात, अशी पावती पवार यांनी गडकरी यांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गडकरी यांनी वैचारिक भूमिका मांडतांना एक टोला विद्यमान राजकारणावर लगावलाच. ते म्हणाले की विचारभिन्नता ठीक पण मनभेद नको. राजकारणापेक्षा राष्ट्रकारण महत्वाचे. मात्र सध्याच्या प्रचलित वातावरणात सत्ताकारण महत्वाचे ठरत आहे, असा टोला त्यांनी मारला. समस्या ही संधी मानावी. संधीला समस्या करू नये. जगला किती यापेक्षा जगला कसा हे महत्वाचे. राजकारण बदलत असले तरी व्यक्तिगत संबंध महत्वाचे. संकटे येतात. पण संबंध टिकले पाहिजे, असे भाष्य गडकरी यांनी केले.

हेही वाचा…पंतप्रधानांच्या बोलण्यात विरोधाभास- शरद पवार

या कार्यक्रमास विदर्भातून सहकार व शिक्षण क्षेत्रातील उपस्थित मंडळी पाहून पवार म्हणाले हीच खरी आयुष्याची कमाई म्हणावी लागेल. सत्कारमूर्ती प्रा. सुरेश देशमुख यांचे अभिष्टचिंतन करण्यास माजी खासदार दत्ता मेघे, खासदार अमर काळे, राजेंद्र शिंगणे, आमदार सुभाष धोटे, अनिल देशमुख, माजी खासदार रामदास तडस,अरविंद सावकार पोरेडीवर, रमेश बंग, बाबुराव तिडके, डॉ. संतोष कोरपे, हर्षवर्धन देशमुख, गिरीश गांधी, सुधीर कोठारी प्रामुख्याने हजर होते. प्रा. देशमुख सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की माझ्या जीवनात शरद पवार नितीन गडकरी यांचे महत्वाचे स्थान राहले आहे. समीर देशमुख यांनी आभार मानले. आयोजन समितीतर्फे देण्यात आलेला पाच लक्ष रुपयाचा कृतज्ञता निधी प्रा. सुरेश व स्वातीताई देशमुख यांनी शैक्षणिक कार्यावर खर्च करण्याचे जाहीर केले.